Tokyo Olympic 2021 | तो चावत राहिला मात्र रवीने पकड सोडली नाही! रवीच्या संयमाला सलाम!

2021-08-05 1,045

ऑलिम्पिकमध्ये(olympics 2020) कुस्तीत 57 किलो वजनी गटात फायनल गाठलेल्या भारताच्या रवी दहियानं(Ravi Dahiya) खरोखर कमाल केलीय. सेमीफायनलमध्ये त्याचा सामना कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लाम सनायेवशी होता. सुरूवातीला कझाकच्या कुस्तीपटूनं मोठी बढत मिळवली होती. मात्र रवीनं डोकं शांत ठेवत आपला खेळ सुरू ठेवला... आणि अखेर हा सामना जिंकत भारतासाठी आणखी एक मेडल पक्कं केलं. मात्र आपण सामना हरतोय हे लक्षात येताच कझाकचा कुस्तीपटूनं रडीचा डाव खेळला.. खिलाडूवृत्तीला काळिमा फासत या कुस्तीपटूनं रवीच्या हाताला जोरदार चावा घेतला. रवी त्याला चितपट करण्यासाठी मेहनत घेत होता. याच वेळी आपण चितपट झालो तर आपला पराजय नक्की हे कळल्यानंतर नुरीस्लाम रवीच्या हाताला चावा घेत होता. बराच वेळ हा सर्व प्रकार सुरू होतं. मात्र रवीनं आपली पडक सैल न करता त्याला पराभूत केलं. अखेर सामना संपल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय. प्रतिस्पर्धी चावा घेत होता मात्र तरीही हिंमत न हरलेल्या रवीनं आपला क्लास दाखवून दिलाय. आता कझाकिस्तानच्या या कुस्तीपटूवर काय कारवाई होते हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Videos similaires